IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK Asia Cup 2022 Live

IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना

हार्दिक पांड्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संपवला सामना 

भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला.

89-4 : सूर्या मावळवला

भारताची संपूर्ण वरची फळी ढेपाळल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जडेजा यांनी डाव सावरला होता. मात्र त्याला पदार्पण करणाऱ्या नसीम शाहने 18 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला.

सूर्यकुमार - जडेजाची महत्वपूर्ण भागीदारी 

भारताचे वरची फळी लवकर माघारी गेल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

62-3 (10 Ov) : भारताने 10 षटकात गमावले 3 फलंदाज

53-3 : नवाजने विराटची देखील घेतली विकेट

आपल्या पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माला (12) बाद केल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीला (35) देखील बाद केले.

 50-2 : रोहित बाद मात्र विराट लढतोय

भारताचा कर्णधार रोहित शर्मा संघाचे अर्धशतक धावफलकावर लावून माघारी परतला. त्याला मोहम्मद नवाजने 12 धावांवर बाद केले.

भारताला पहिल्याच षटकात पहिला धक्का

पाकिस्तानच्या टी 20 पदार्पण करणाऱ्या नसीम शाहने पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुलचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

अर्शदीप सिंगने संपवला पाकिस्तानचा डाव

अर्शदीप सिंगने 6 चेंडूत 16 धावा करणाऱ्या शहानवाज दहानीचा शेवटच्या चेंडूवर त्रिफला उडवत पाकिस्तानचा डाव 147 धावात संपवला.

भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानची शेपुट गुंडाळली

भुवनेश्वर कुमारने 19 व्या षटकात सलग दोन विकेट घेत पाकिस्तानची अवस्था 9 बाद 128 धावा अशी केली.

112-6 : पाकिस्तानचा फिनिशर देखील माघारी

भुवनेश्वर कुमारने आसिफ अलीला 9 धावांवर बाद करत पाकिस्तानचा मॅच फिनिशर देखील माघारी धाडला.

97-5 : हार्दिकचा पाकिस्तानला तिसरा हादरा

हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात शॉर्ट बॉलचा चांगला मारा करत पाकिस्तानची मधली फळी कापून काढली. त्याने खुशदील शाहला 2 धावांवर बाद केले. हार्दिक पांड्याने आपल्या स्पेलमध्ये सातत्याने 140 किलोमिटर प्रतीतास वेगाने गोलंदाजी केली.

96-4 : हार्दिकचा पाकिस्तानला मोठा धक्का

हार्दिक पांड्याने बाऊन्सरवर इफ्तिकारला बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर जो झुंजार फलंदाजी करत होता त्या मोहम्मद रिझवानला 43 धावांवर बाद केले.

87-3 : हार्दिक पांड्याने जोडी फोडली

हार्दिक पांड्याने रिझवान आणि इफ्तिकार यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठीची 45 धावांची भागीदारी संपवली. त्याने इफ्तिकारला बाऊन्सरवर बाद केले. इफ्तिकार अहमदने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली.

68-2 (10 Ov) : मोहम्मद रिझवानची झुंजार बॅटिंग

सलामीवीर मोहम्मद रिझवानने भारताच्या गोलंदाजांचा चांगला सामना करत इफ्तिकार अहमदसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाकिस्तानला 10 षटकात 68 धावांपर्यंत पोहचवले.

42-2 : आवेश खानने फकर झमानला केले बाद

बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव फकर झमान आणि मोहम्मद रिझवानने सावरला. मात्र ही जोडी आवेश खानने फोडली. त्याने फकर झमानला 10 धावांवर बाद केले.

भुवनेश्वर कुमारने बाबर आझमचा अडसर केला दूर

भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या तिसऱ्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार बॅट्समन बाबर आझमला 10 धावांवर बाद करत पहिला आणि मोठा धक्का दिला.

14-0 (2 Ov) पाकिस्तानची आश्वासक सुरूवात

पहिल्याच षटकात पाकिस्तान आणि भारत यांनी रिव्ह्यू घेतल्याने भुवनेश्वरचे षटक चांगलेच हॅपनिंगवाले राहिले. मात्र पाकिस्तानचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि मोहम्मद रिझवान दुसऱ्याच चेंडूवर बचावला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताने रिव्ह्यू घेतला मात्र तो अयशस्वी ठरला.

भारत तीन वेगवान गोलंदाज घेऊन उतरणार

भारत पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात तीन वेगवान गोलंदाज घेऊन उतरणार आहे. याचबरोबर आजच्या सामन्यात ऋषभ पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे तीन वेगवान गोलंदाज असणार आहेत.

भारताने नाणेफेक जिंकली

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या मैदानावर जो संघ नंतर चेस करतो त्याला सामना जिंकण्याची जास्त संधी असते.

विराटच्या 100 व्या सामन्यासाठी रोहितसह टीम इंडियाने  दिल्या शुभेच्छा

आज विराट कोहलीचा 100 वा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना आहे. तो भारताकडून तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. तर तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा तो जागतिक स्तरावरील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळले होते. या विशेष कामगिरीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाने विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या.

Asia Cup IND vs PAK Playing-11 : पंत-कार्तिक कोण होणार बाहेर? हे असू शकते भारत-पाक प्लेइंग-11

भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग-11 मध्ये बरेच बदल करू शकतो. माजी कर्णधार विराट कोहली 41 दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि केएल राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळण्याची खात्री आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IND vs PAK Pitch Report : भारत-पाक सामन्यात कोणाला मिळणार खेळपट्टीची मदत

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने यूएईमध्ये गेल्या 17 सामन्यांपैकी केवळ एक टी-20 सामना गमावला आहे. गेल्या वर्षी दुबईच्या खेळपट्टीवर पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

AB de Villiers on Kohli : डिव्हिलियर्सने 100 व्या टी-20 सामन्यापूर्वी विराटला दिल्या खास शुभेच्छा!

भारताचा माजी कर्णधार कोहली आज आपल्या कारकिर्दीतील 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. या स्पेशल मॅचपूर्वी डिव्हिलियर्सने त्याला शुभेच्छा दिल्या आहे.

Asia Cup 2022: भारत पाकिस्तान मॅच कधी? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग, प्लेइंग 11 आणि खूप काही...

 • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामना कधी होणार?

  आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्ट (रविवार) रोजी सामना होणार आहे.

 • आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोठे आणि कधी खेळला जाईल?

  आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल.

 • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण, लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहायचे?

  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर. सामन्याच्या लाइव्ह अपडेटसाठी सकाळ वेबसाइटला फॉलो करा.

 • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.

 • पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

India vs Pakistan (IND vs PAK) T20 Asia Cup 2022 Live Cricket Score :

भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला. हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. त्याला जडेजाने 29 चेंडूत 35 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली.

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने पाकिस्तानचा डाव 147 धावात संपवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या.

भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली.

पहिल्याच षटकात पाकिस्तान आणि भारत यांनी रिव्ह्यू घेतल्याने भुवनेश्वरचे षटक चांगलेच हॅपनिंगवाले राहिले. मात्र पाकिस्तानचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि मोहम्मद रिझवान दुसऱ्याच चेंडूवर बचावला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉर्ट बॉलने सप्राईज केले. बावचळवलेल्या बाबरला चेंडू कळालाच नाही आणि तो अर्शदीप सिंगकडे झेल देऊन 10 धावांवर परतला.

बाबर आझम बाद झाल्यानंतर सलामीवीर मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने मधल्या फळीतील फलंदाजांबरोबर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही भागीदारी तोडण्यात हार्दिकला यश आले. हार्दिक पांड्याने रिझवान आणि इफ्तिकार यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठीची 45 धावांची भागीदारी संपवली. त्याने इफ्तिकारला बाऊन्सरवर बाद केले. इफ्तिकार अहमदने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिकने मोहम्मद रिझवानला 43 धावांवर बाद करत पाकिस्तानचा सेट झालेला फलंदाज बाद केला.

हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात शॉर्ट बॉलचा चांगला मारा करत पाकिस्तानची मधली फळी कापून काढली. त्याने खुशदील शाहला 2 धावांवर बाद केले. हार्दिक पांड्याने आपल्या स्पेलमध्ये सातत्याने 140 किलोमिटर प्रतीतास वेगाने गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 25 धावात 3 तर भुवनेश्वर कुमारने 26 धावात 4 बळी टिपले. तर या दोघांना अर्शदीपने 2 तर आवेश खानने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

Web Title: India Vs Pakistan Asia Cup 2022 Live Cricket Score Updates Rohit Sharma Virat Kohli Babar Azam Ind Vs Pak T20 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..