Asia Cup 2022 : 'महिनाभर बॅटला हातही लावला नव्हता'; फॉर्मचा मानसिकतेवर परिणाम - विराट

प्रदीर्घ काळ सूर हरपल्याचा परिणाम मानसिकतेवर झाल्याचे विराट कोहलीने मान्य केले. आशिया करंडक स्पर्धेपूर्वीच्या महिनाभरातील ब्रेकमध्ये आपण बॅटला हातही लावला नव्हता, अशी कबुलीही त्याने दिली.
Asia Cup 2022 IND vs PAK Virat Kohli
Asia Cup 2022 IND vs PAK Virat Kohli

Asia Cup 2022 IND vs PAK Virat Kohli : प्रदीर्घ काळ सूर हरपल्याचा परिणाम मानसिकतेवर झाल्याचे विराट कोहलीने मान्य केले. आशिया करंडक स्पर्धेपूर्वीच्या महिनाभरातील ब्रेकमध्ये आपण बॅटला हातही लावला नव्हता, अशी कबुलीही त्याने दिली.

जवळपास तीन वर्षे विराट कोहलीला कोणत्याही प्रकारात शतक करता आलेले नाही. धावांचाही ओघ आटलेला असल्यामुळे आपली मानसिकता कमजोर झाल्याचे सांगण्यात आपल्याला कमीपणा वाटणार नाही, असे विराटने स्टार स्पोर्टसवरील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

Asia Cup 2022 IND vs PAK Virat Kohli
Asia Cup : IND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज! राहुल द्रविड संघात सामील

१० वर्षांत प्रथमच घडले...

गेल्या १० वर्षांत असे प्रथमच घडले आहे, की मी महिनाभर तरी बॅटला हात लावला नाही. प्रबळ इच्छाशक्ती आपल्याला पुढे ढकलत असल्याचे मला उगाचच जाणवत होते, असे सांगून विराट पुढे म्हणतो, इच्छाशक्ती प्रबळ असल्याचे मी स्वतःलाच सांगत होतो, पण माझे शरीर मला थांबण्याचे संकेत देत होते. काही काळ थांब आणि ब्रेक घे, असे माझे मन मला सांगत होते.

विराटने आपले अखेरचे शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात झळकावले होते. गेल्या पाच सामन्यांत त्याची २० ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. मानसिकृदष्ट्या अतिशय सक्षम असा मी होतो, पण प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात आणि त्याची जाणीव होणे महत्त्वाचे असते; अन्यथा पुढचा प्रवास अवघड होत जातो. सध्याच्या या काळाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत, असे विराटने सांगितले. विराट उद्या १०० वा ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, माझा हा कितवा सामना आहे हे महत्त्वाचे नाही, संघाच्या विजयासाठी मी सर्वस्व देणार आहे.

Asia Cup 2022 IND vs PAK Virat Kohli
Afg vs SL Asia Cup: श्रीलंकेला 20 षटकेही खेळता आली नाहीत? जाणून घ्या 5 कारणे

जेव्हा तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करता तेव्हा दडपणाचा सामना करत आणि शक्य तेव्हढे शांत राहून योग्य काम करण्याकडे लक्ष देता तेव्हा योग्य निकाल मिळायची शक्यता वाढते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटले की अपेक्षा एकदम वाढतात. आम्हालाही त्या जाणवतात. फक्त बाहेर काय चालू आहे त्याचा विचार न करता शांत राहून आपल्या कामावर लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. खेळाडू म्हणून मी तेच करायचा प्रयत्न करतो. भारत-पाकिस्तान हा सामना दोन्हीकडच्या चाहत्यांकरता मेजवानी असते.

- रोहित शर्मा, भारतीय कर्णधार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com