Afg vs SL Asia Cup: श्रीलंकेला 20 षटकेही खेळता आली नाहीत? जाणून घ्या 5 कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka vs Afghanistan T20 Asia Match

Afg vs SL Asia Cup: श्रीलंकेला 20 षटकेही खेळता आली नाहीत? जाणून घ्या 5 कारणे

Sri Lanka vs Afghanistan T20 Asia Cup Match: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 8 विकेट्स राखून पराभव केला. श्रीलंकेचा डाव पाहिल्यानंतर अफगाणिस्तानने हा सामना जिंकल्याचे दिसते होते. श्रीलंकेची कामगिरी या सामन्यात अत्यंत खराब राहिली. पहिल्याच षटकातच संघाचा पहिला फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्याच षटकात निशांकाची विकेट पडली, त्याच्या या विकेटवरून बराच गदारोळ झाला. श्रीलंकेसाठी 20 षटकेही खेळणे कठीण झाले होते. श्रीलंकेला फ्कत 106 धावा करता आल्या.

हेही वाचा: Asia Cup 2022 : श्रीलंका सर करण्यात अफगाणिस्तानला लाभली 'पाकिस्तानी' मदत

श्रीलंकेला 20 षटकेही खेळता का आली नाहीत? हे 5 कारणे

  • नाणेफेक गमावणे

  • खराब शॉट निवड

  • स्कोअर करण्यासाठी घाई

  • सलामीवीरला धावा करता आल्या नाही

  • खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव, त्यामुळे दोन खेळाडू धावबाद झाले

Afg vs SL निराशाजनक कामगिरी

अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकातच श्रीलंकेची अवस्था 3 बाद 5 धावा केल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज फैजलहक फारूकीने 11 धावा देत 3 विकेट घेतल्या. श्रीलंकन ​​संघाचा कर्णधार दासून शनाकाने सामन्यापूर्वी सांगितले होते की, नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. या खेळपट्टीवर नंतर खेळणारे संघ अनेकदा जिंकतात असे दिसून आले आहे.

हेही वाचा: Asia Cup SL vs AFG : अफगाणिस्तानने सामना 10 षटकातच संपवला

सामन्यादरम्यान, श्रीलंकेचा संघ धावा करण्यात झटपट होता, त्यामुळे त्यांच्या शॉटच्या निवडीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. श्रीलंकेचा संघ भागीदारी रचू शकला नाही, फटके मारण्यात अधिक विश्वास ठेवल्याचे दिसून आले. संघात समन्वयाचाही अभाव होता. त्यामुळे दोन खेळाडू धावबाद झाले. कर्णधारालाही चांगली कामगिरी करता आली नाही आणि पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 105 धावात संपुष्टात आणला. अफगाणिस्तानकडून फैजलहक फारूकीने 3 विकेट घेतल्या. तर कर्णधार मोहम्मद नबी आणि नजीब उर रेहमानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेचे 106 धावांचे आव्हान अफगाणिस्तानने रेहमानुल्ला गुरबाजने 40 तर हझरतुल्ला झजाईने 37 धावा केल्या. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षाने 38 तर चमिका करूणारत्नेने 31 धावा केल्या.

Web Title: Sri Lanka Vs Afghanistan T20 Asia Cup Match Sri Lanka Team Very Bad Condition Afghanistan Win The Game By 8 Wickets Afg Vs Sl T20 Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..