Asia Cup India Vs Pakistan : सामन्याची खेळपट्टी आहे कशी, हवामानाचा अंदाज काय सांगतोय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2022 India Vs Pakistan Match Venue Pitch Weather Report Rain Update

Asia Cup India Vs Pakistan : सामन्याची खेळपट्टी आहे कशी, हवामानाचा अंदाज काय सांगतोय?

Asia Cup 2022 India Vs Pakistan : आशिया कपच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. 28 ऑगस्टचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार असून या सामन्याबाबत चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गतवर्षी टी 20 वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तानचा सामना देखील याच स्टेडियमवर झाला होता. त्यामुळे चाहत्यांच्या मनात आता या स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल? सामन्यादिवशी हवामानाचा काय अंदाज आहे? सामन्यात पावसाचा व्यत्यय तरी येणार नाही ना? असे प्रश्न पडले असतील. (Asia Cup 2022 India Vs Pakistan Match Venue Pitch Weather Report Rain Update)

हेही वाचा: India Vs Pakistan : यांना सीमेवर पाठवा! नेटकऱ्यांना पंत - चहलची शाहीनशी 'जवळीक' खटकली

तर 28 ऑगस्टच्या भारत पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सांयकाळी 7.30 वाजता सुरू होईल. यंदाचा आशिया कप संयुक्त अरब अमिरातीमध्ये तीन स्टेडियमवर रंगणार आहे. यात शारजा क्रिकेट स्टेडियम, शेख झायेद स्टेडियम ( अबु धाबी ) आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम यांचा समावेश आहे. आशिया कपची फायनल देखील दुबईमध्येच होणार आहे.

कशी आहे दुबईची खेळपट्टी?

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी सहसा पाटा खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. मात्र दोन ते तीन सलग सामने झाल्यानंतर ही खेळपट्टी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देते. खेळपट्टीवर सलग दोन ते तीन सामने झाल्यानंतर खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी आणि चेंडू जास्त सीम होण्यास सुरूवात होते. मात्र पहिले काही सामने हे हाय स्कोरिंग होतील असा अंदाज आहे. गोलंदाजांच्या दृष्टीकोणातून पहावयाचे झाले तर 180 आणि 190 धावांचे टार्गेट देखील या स्टेडियमवर सेफ टार्गेट नाही. दुबईत नाणेफेकीला जास्त महत्व आहे. जो सामना टॉस जिंकले तो सामना जिंकले असे काहीसे चित्र दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यांवरून दिसते.

हेही वाचा: India Vs Pakistan : बुडत्याचा पाय खोलात! Asia Cup मध्ये पाकिस्तानला अजून एक धक्का?

India Vs Pakistan सामन्यावेळी हवामानाचा अंदाज काय राहील?

भारत पाकिस्तान सामन्यावेळी तापमान थोडे उष्णच राहील. तापमान जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सीस असेल. या भागात 28 ऑगस्टला पाऊस पडणार असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. संध्याकाळी आद्रता देखील कमी असेल.

स्टेडियमची लांबी रूंदी कशी आहे?

दुबईचे स्टेडियम हे आबू धाबीसारखे मोठे नाही. दुबईची समोरची बाऊंड्री लहान आहे. त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. समोरची बाऊंड्री ही 65 मीटर लांब आहे. तर स्क्वेअरची बाऊंड्री ही तुलनेने मोठी आहे. ऑफ साईडची स्क्वेअर बाऊंड्री ही 82 मीटर तर लेगची स्क्वेअर बाऊंड्री ही 80 मीटर आहे. त्यामुळे व्हीमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांना समोरच्या छोट्या बाऊंड्रीचा चांगला फायदा उचलता येईल.

Web Title: Asia Cup 2022 India Vs Pakistan Match Venue Pitch Weather Report Rain Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..