Asia Cup 2022 SL vs PAK : लंकेने पाकचे कंबरडेच मोडले; फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2022 Wanindu Hasaranga

Asia Cup 2022 SL vs PAK : लंकेने पाकचे कंबरडेच मोडले; फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली

Asia Cup 2022 SL vs PAK : आशिया कपच्या फायनलची रंगीत तालीम म्हणून समजल्या जाणाऱ्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 121 धावात रोखले. श्रीलंकेच्या फिरकीपुढे पाकिस्तानच्या भल्या भल्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 4 षटकात 21 धावा देत 3 तर महीश तिक्षाणाने देखील 4 षटकात 21 धावाच देत 2 विकेट घेतल्या. या दोघांनी पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 30 धावा केल्या. (Asia Cup 2022 Sri Lanka Restrict Pakistan in 121 Runs Wanindu Hasaranga Maheesh Theekshana Shine)

हेही वाचा: Virat Kohli : विराट रोहितला म्हणतो, तू जी स्पेस मला दिलीस त्यामुळे...

श्रीलंकेने पाकिस्तानला पॉवर प्लेमध्येच मोठा धक्का दिला. आशिया कपध्ये कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद रिझवानला आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या प्रमोद मदुशानने 14 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार बाबर आझमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र फखर झमानने (13) पुन्हा एकदा निराशा केली.

दरम्यान, श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगाने बाबर आझमची खेळी 30 धावांवर संपुष्टात आणत पाकिस्तानच्या फलंदाजीचा बॅक बोनच पॅव्हेलियनमध्ये धाडला. यानंतर मोहम्मद नवाझने पाकिस्तानला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 18 चेंडूत 26 धावांची खेळी करत पाकिस्तानला शतक पार करून दिले. मात्र वानिंदू हसरंगा आणि महीश तिक्षाणाने भेदक मारा करत पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा देखील पार करू दिला नाही.

हेही वाचा: Asia Cup 2022 SL vs PAK : फायनलच्या रंगीत तालमीत पाकिस्तानचा नवा हिरो नसीम बेंचवर

अखेर पाकिस्तानचा डाव 19.1 षटकात 121 धावात संपुष्टात आला. हसरंगाने 21 धावात 3 तर तिक्षाणा आणि प्रमोद मदुशान यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. यांना धनंजया डी सेल्वा आणि चमिरा करूणारत्ने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून बाबार आझम (30), मोहम्मद रिझवान (14), फकर झमान (13), इफ्तिकार अहमद (13) आणि मोहम्मद नवाझ (26) या पाच फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

Web Title: Asia Cup 2022 Sri Lanka Restrict Pakistan In 121 Runs Wanindu Hasaranga Maheesh Theekshana Shine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..