Virat Kohli : दुष्काळ संपला! 194 दिवसांनंतर विराटच्या बॅटमधून अर्धशतक

Virat Kohli Asia cup
Virat Kohli Asia cup

Asia Cup 2022 Virat Kohli : भारताने हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यात सावध सुरूवात केली होती. पहिली 12 षटके झाली तरी भारताचे शतक धावफलकावर लागले नव्हते. मात्र त्यानंतर बॉल टू रन धावा करणाऱ्या विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याने आपले अर्धशतक 40 चेंडूत पूर्ण करत भारताला 150 च्या जवळ पोहचवले. विशेष म्हणजे विराट कोहलीने 194 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी केली.

Virat Kohli Asia cup
Rohit Sharma : रोहितने धावा कमी केल्या मात्र एक माईल स्टोन देखील केला पार

भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाला त्यावेळी नुकताच पॉवर प्ले संपला होता. मात्र त्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. त्याने सलामीवीर केएल राहुल सोबत दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. विराट कोहली त्यावेळी बॉल टू रन धावा करत होता. दरम्यान, केएल राहुल बाद झाला.

त्यानंतर विराट कोहलीने आपला गिअर बदलला. त्याने सूर्यकुमार यादवच्या साथीने भारताला 150 च्या जवळ पोहचवले. विराट कोहलीने 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे विराट कोहलीने 18 फेब्रवारी 2022 मध्ये वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्यात आपले शेवटचे अर्धशतक ठोकले होते. आता जवळपास 194 दिवसांचा अर्धशतकाचा दुष्काळ विराट कोहलीने संपवला. विराट कोहलीचे हे 31 वे टी 20 अर्धशतक आहे.

Virat Kohli Asia cup
BCCI ला 'दुकान' म्हणणे योग्य; सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले

विराट कोहली पाठोपाठ सूर्यकुमार यादवने देखील आक्रमक फलंदाजी करत भारताला 150 धावांच्या पार पोहचवले. सूर्यकुमार यादवने 19 चेंडूतच 41 धावा चोपल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com