Asia Cup 2022 साठी व्हीव्हीएस लक्ष्मण हंगामी मुख्य प्रशिक्षक; BCCIचं शिक्कामोर्तब

27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
Laxman
Laxman

Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना दुबईला पाठवले असून आता लक्ष्मण टीम इंडियाचे हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. बीसीसीआयनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Laxman
Shubman Gill Sara Tendulkar : शुभमन अन् साराच ब्रेकअप? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

झिम्बाब्वे दौऱ्यावर काही खेळाडू देखील होते, जे आशिया कप 2022 चा भाग होणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार ते खेळाडू आणि व्हीव्हीएस लक्ष्मण दुबईला पोहोचले आहेत. राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाली आहे, अशा स्थितीत संघाला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिकासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण गेले आहेत. आशिया चषकाचा भाग असलेल्या संघासह VVS हरारेहून दुबईला रवाना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Laxman
Punjab Kings Captaincy : मयंकची कॅप्टन्सी काढली? पंजाब किंग्ज संघानं दिलं स्पष्टीकरण

व्हीव्हीएस लक्ष्मण हे 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत UAE मध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी भारताचे तात्पुरते प्रशिक्षक असतील हे अद्याप अधिकृत नाही, कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोनाव्हायरस चाचणीमुळे UAE ला जाऊ शकले नाहीत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) बंगळुरूचे प्रमुख लक्ष्मण यांचे अधिकृतपणे नाव दिलेले नाही.

भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. दुबईतील हा सामना जिंकून टीम इंडियाला 2021 मध्ये पराभवाचा बदला घ्यायचा आहे. गेल्या वर्षी दुबईतच पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानकडून पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ होती. आता भारताला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com