Shubman Gill And Sara Tendulkar : शुभमन अन् साराच ब्रेकअप? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill Sara Tendulkar

Shubman Gill Sara Tendulkar : शुभमन अन् साराच ब्रेकअप? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो

Shubman Gill And Sara Tendulkar: भारताने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने तीन एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. गिलने मालिकेत 245 धावा केल्या. मालिकेच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर गिल प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यातच आता मास्टर ब्लास्टरच्या लेकीसोबतच्या अफेअरचे किस्से पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले. युजर्सनी दोघांबद्दल अनेक प्रकारचे मीम्स बनवले.

हेही वाचा: Punjab Kings Captaincy : मयंकची कॅप्टन्सी काढली? पंजाब किंग्ज संघानं दिलं स्पष्टीकरण

दरम्यान सारा आणि शुभमनचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले असता दोघेही एकमेकांना अनफॉलो केले आहे. मात्र सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शहनील गिलला फॉलो केले आहे. यानंतर दोघांची मैत्री संपली की काय अशी अटकळ बांधली जात आहे. सारा आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा पहिल्यांदा 2019 मध्ये पसरली होती. या दोघांनीही यावर कधीही भाष्य केले नाही, परंतु त्यांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात आणि सोशल मीडियावर या नात्याबद्दल बरेच मीम्स बनवले जातात.

Shubman Gill And Sara Tendulkar

Shubman Gill And Sara Tendulkar

शुभमन गिल कोलकाता नाईट रायडर्स 2019 मध्ये संघाचा भाग होता. या हंगामानंतर त्याने 'रेंज रोव्हर' कार खरेदी केली होती. त्याचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला. साराने या फोटोवर शुभमनचे अभिनंदन केले होते आणि शुभमनने हृदयाच्या इमोजीसह त्याचे आभारही मानले होते. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी दोघांमधील अफेअरला हवाही दिली होती. येथून त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. गिल आणि सारा यांच्यात सर्व काही ठीक नाही आणि या अफवांचा त्यांच्या मैत्रीवरही परिणाम झाला आहे.

Web Title: Shubman Gill Sara Tendulkar Breakup They Are Unfollowed Each Other On Instagram Relationship Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..