Asia Cup : टीम इंडियाच्या विजयानंतर स्टेडियममध्ये जोरदार राडा! शिवीगाळ, धक्काबुक्की अन्... व्हिडिओ व्हायरल

India-Sri Lanka fans engage in ugly fight
India-Sri Lanka fans engage in ugly fight

Asia Cup 2023 India vs Sri Lanka : आशिया कप 2023 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अंतिम सामन्यासह केवळ तीन सामने शिल्लक आहेत. भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप-2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने मंगळवारी रात्री झालेल्या सुपर-4 फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला.

दरम्यान, टीम इंडियाच्या विजयानंतर स्टेडियममध्ये जोरदार राडा पाहिला मिळाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आधी चाहत्यांमध्ये शिवीगाळ झाली नंतर धक्काबुक्की पाहिला मिळाली.

India-Sri Lanka fans engage in ugly fight
Asia Cup 2023 : आशिया कप फायनलआधी 'या' खेळाडूने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन! संघातून जाणार बाहेर?

213 धावा करणाऱ्या टीम इंडियाने श्रीलंकेचा संघ अवघ्या 172 धावांवर रोखला आणि रोहित अँड कंपनीने 41 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. भारतीय क्रिकेट संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने सुपर-4 फेरीत पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. यानंतर श्रीलंकेला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. आता टीम इंडियाचा आणखी एक साखळी सामना बाकी असून शुक्रवारी बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. रविवारी अंतिम सामना होणार आहे.

India-Sri Lanka fans engage in ugly fight
Asia Cup 2023: भारत अन् पाकिस्तान अंतिम फेरीत कसे भिडणार? जाणून घ्या सर्व समीकरणं

फायनल कोण खेळणार?

फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हा प्रश्न आहे. 14 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने याचा निर्णय होईल. दोन्ही संघांचे 2-2 गुण आहेत आणि जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. आशिया कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान अंतिम सामना कधीच झाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com