Asia Cup Marathi Commentary : आशिया कप, वर्ल्डकपमधील सामन्यांचे समालोचन मराठीतून करा.... मराठी एकीकरण समितीची मागणी

Asia Cup 2023 Marathi Commentary
Asia Cup 2023 Marathi Commentaryesakal

Asia Cup 2023 Marathi Commentary : भारतीय संघ 30 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया कप खेळणार आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्डकपची सुरूवात होईल. या दोन्ही मोठ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्सवरून केले जाणार आहे. या सामन्यांचे समालोचन हे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत होणार आहे.

मात्र मराठी एकीकरण समितीने स्टार स्पोर्ट्सचे कार्यालय मुंबईत असल्याने आशिया कप आणि वर्ल्डकप सामन्यांचे समालोचन मराठीतूनही करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Asia Cup 2023 Marathi Commentary
Virat Kohli BCCI : विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज... अधिकाऱ्यांनी पाठवला फिटनेस कॅम्पमध्ये 'मेसेज'

स्टार स्पोर्ट्सकडून इतर सर्व भाषेत क्रिकेट सामन्यांचे समालोचन होते. मात्र मराठी भाषेला कायमच डावलण्यात येत आहे. स्टार स्पोर्ट्सचे कार्यालय हे मुंबईत आहे. तरी देखील मराठी भाषेला महत्व दिलं जात नाही. मराठी क्रिकेट रसिकांना क्रिकेटचा मराठीतून आनंद घेण्यापासून दूर ठेवले जाते.

Asia Cup 2023 Marathi Commentary
Ravichandran Ashwin : युवराज, धोनी निवृत्त झाल्यापासून.... अश्विनने भारतीय संघाची दुखरी नस पकडली

यासाठीच मराठी एकीकरण समितीचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष सचिन दाभोळकर यांनी आशिया कप आणि वर्ल्डकप सामन्यांचे मराठीतून देखील समालोचन व्हावे अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष राकेश फोडकर आणि इतर कार्यकर्ते होते. या सर्वांनी संजोग गुप्ता यांना लेखी निवेदन देऊन सामन्यांचे मराठीत समालोचन करण्यात यावे अशी मागणी केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com