SL vs BAN : एकाचेही अर्धशतक नाही! तरी बांगलादेशने केल्या 183 धावा

Asia Cup Bangladesh Set Target of 184 runs In Front Of Sri Lanka no Batsmen Scored Half Century
Asia Cup Bangladesh Set Target of 184 runs In Front Of Sri Lanka no Batsmen Scored Half CenturyESAKAL

Asia Cup Sri Lanka vs Bangladesh 5th Match Group B : आशिया कप ग्रुप B मधील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने अडखळत्या सुरूवातीनंतर दमदार कमबॅक करत श्रीलंकेसमोर 184 धावांचे आव्हान ठेवले. बांगलादेशकडून अफिफ हुसैनने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तर मोसाददेकने 9 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. श्रीलंकेकडून हसरंगा आणि कुरूणारत्ने यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 40 धावांच्या वर धावा करता आल्या नाहीत तरी संघाने 20 षटकात 7 बाद 183 धावांपर्यंत मजल मारली.

Asia Cup Bangladesh Set Target of 184 runs In Front Of Sri Lanka no Batsmen Scored Half Century
T20 World Cup: उलटी गिनती सुरू! काही दिवसांत जाहीर होणार भारतीय संघ! 'या' खेळाडूंचे स्थान निश्चित

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरूवात अडखळती झाली. सलामीवीर शब्बीर रहमान 5 धावांची भर घालून परतला. त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहंदी हसन मिराज यांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी बांगलादेशचे अर्धशतक धावफलकावर लावले असतानाचा हसरंगाने मेहंदी हसनला 38 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर मुशफिकूर रहीम देखील 4 धावांची भर घालून माघारी परतला.

या धक्क्यातून बांगलादेश सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तिक्षाणाने कर्णधार शाकिबचा 24 धावांवर त्रिफळा उडवला. बांगलादेशची 4 बाद 87 धावा अशी अवस्था झाली असताना अफिफ हुसैन आणि मोहम्मदुल्लाने आक्रमक फलंदाजी करत बांगलादेशची धावगती वाढवली. या दोघांनी पाचव्या विकेटासाठी अर्धशतकी (57 धावा) भागीदारी रचली.

Asia Cup Bangladesh Set Target of 184 runs In Front Of Sri Lanka no Batsmen Scored Half Century
Virat Kohli : फॉर्ममध्ये येताच विराटने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला टाकले मागे

दरम्यान, दिलशान मधुशनका आणि वानिंदू हसरंगाने अफिफ (39) आणि मोहम्मदुल्लाला (27) बाद करत बांगलादेशची अवस्था 17.1 षटकात 6 बाद 147 धावा अशी केली. इथून बांगलादेश मोठी धावसंख्या उभारले असे वाटत नव्हते. मात्र मोसाददेक हुसैनने 9 चेंडूत नाबाद 24 धावांची खेळी करत बांगलादेशला 183 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com