Asia Cup Bridge: गोव्यातील दोना पावला येथे २१ ते २७ जूनदरम्यान प्रतिष्ठेची पाचवी आशिया कप ब्रिज स्पर्धा; २० देशांचा सहभाग अपेक्षित
Goa To Host Asia Cup Bridge Tournament: गोव्यातील दोना पावला येथे जून महिन्यात प्रतिष्ठेची पाचवी आशिया कप ब्रिज स्पर्धा रंगणार असून २० देशांचा सहभाग अपेक्षित आहे.
पणजी : गोव्यातील दोना पावला येथे प्रतिष्ठेची पाचवी आशिया कप ब्रिज स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धा २१ ते २७ जून या कालावधीत खेळली जाईल. यासंबंधी घोषणा भारतीय ब्रिज महासंघातर्फे करण्यात आली.