IND vs PAK: हाय व्होल्टेज पाकिस्तानने अखेरच्या क्षणी साधली बरोबरी | Asia Cup Hockey 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup Hockey 2022 IND vs PAK Live Match Score

IND vs PAK: हाय व्होल्टेज पाकिस्तानने अखेरच्या क्षणी साधली बरोबरी

आशिया कप हॉकी (Asia Cup Hokey) स्पर्धेत गतविजेत्या टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना पाकिस्तान (Pakistan) बरोबर होत आहे. या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर आघाडी घेतली आहे. सध्या भारताकडे 1 - 0 अशी आघाडी आहे. भारताने 9 व्या मिनिटाला ही आघाडी मिळवली. पेनाल्टी कॉर्नरवर सेल्वम कार्थीने एक शॉट लगावला. हा फटका पाकिस्तानी डिफेंडरच्या हॉकी स्टिकला लागून गोलपोस्टमध्ये गेला. त्यामुळे भारताला आघाडी मिळीली.

भारताने ही एक गोलची आघाडी हाफटाईम पर्यंत कायम ठेवली. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील ही आघाडी कायम ठेवली. भारत हा सामना जिंकणार असे वाटत होते. भारताने चौथ्या क्वार्टरमध्ये देखील आघाडी कायम ठेवली होती. मात्र पाकिस्तानने अखेरच्या क्षणी गोल करून बरोबरी साधली.

Web Title: Asia Cup Hockey 2022 Ind Vs Pak Live Match Score

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top