Asia Cup : भारताने श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार का घातला होता?

Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations
Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations esakal

Asia Cup 2022 : आशिया कपचा थरार 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होत आहे. यंदाचा आशिया कप टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असून आधी याचं यजमानपद हे श्रीलंकेकडे होतं. मात्र श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणी पाहता त्यांनी आशिया कपचे आयोजन करण्यास नकार दिला. त्यानंतर आशिया कप हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. आशिया कपवर श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणीचा परिणाम झाला आहे. (Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations)

तसेही आशियातील क्रिकेटिंग नेशनमधील राजकीय संबंधांचेही आशिया कपवर कायम सावट असते. आशिया कपवर बहिष्कार घालण्यात भारत आणि पाकिस्तान आघाडीवर आहेत. या दोन देशांमध्येच राजकीय संबंध हे सातत्याने विकोपाला जातात. मात्र भारताने श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार घातला तो वेगळ्या कारणाने.

Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations
Video | Asia Cup 2022 : किंग कोहलीने केली दुखापतग्रस्त शाहीनची विचारपूस

आशिया कपची सुरूवात संयुक्त अरब अमिरातीमधून 1984 साली झाली होती. पहिला आशिया कप सुरळीत पार पडला, मात्र 1986 च्या दुसऱ्या आशिया कपवर भारताने बहिष्कार घातला. हा कप श्रीलंकेत आयोजित केला होता. मात्र त्याच्या आदल्या वर्षी श्रीलंकेत झालेल्या वादग्रस्त मालिकेमुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट संबंध बिघडले होते. यामुळेच भारताने दुसऱ्या आशिया कपवर बहिष्कार घातला होता. त्यावेळी बांगलादेशने आशिया कपमध्ये एन्ट्री केली होती.

भारतीय संघ 1985 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी संघाचे नेतृत्व कपिल देव करत होते. मात्र भारत ही मालिका हरला होता. या मालिकेतील पंचांचे निर्णय सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याचेच कारण देत भारताने श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपवर बहिष्कार घातला. मात्र यात काळात श्रीलंकेत गृह युद्ध भडकले होते. हे देखील भारताने आशिया कपवर बहिष्कार घालण्यामागचे महत्वाचे कारण होते.

Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations
आशिया करंडक स्पर्धेत मुख्य फेरीसाठी हॉँगकाँग पात्र

त्यानंतर आशिया कपचा चौथा हंगाम हा भारतात 1990 - 91 ला झाला. या स्पर्धेवर पाकिस्तानने भारताबरोबरचे राजकीय संबंध बिघडल्याने बहिष्कार घातला होता. त्यावेळचा आशिया कप भारताने जिंकला होता. त्यांनी अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला होता. याचबरोबर 1993 चा आशिया कप देखील भारत - पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या राजकीय संबंधामुळे रद्द करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com