Asia Cup 2022 थीम सॉंग रिलीज, चाहत्यांनी व्हिडिओला घेतले डोक्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2022

Asia Cup 2022 थीम सॉंग रिलीज, चाहत्यांनी व्हिडिओला घेतले डोक्यावर

Asia Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप 2022 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. याआधी भारतीय संघाला आशिया चषक खेळायचे आहे. आशिया चषक स्पर्धा पुढील महिन्यात श्रीलंका क्रिकेट बोर्ड आयोजन करणार होती. परंतु श्रीलंकेतील परिस्थिती पाहता आशिया चषक युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून, त्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे.

आशिया कपमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ सहभागी होणार आहेत. ब्रॉडकास्टर्सनी आशिया कप थीम सॉन्ग रिलीज केले आहे, ज्यामध्ये सर्व संघ अ‍ॅक्शन करताना दिसत आहेत. भारतीय संघाने 2016 आणि 2018 मध्ये विजय मिळवला आहे.

आशिया चषक भारतासाठी देखील अधिक महत्वाचा आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीआशिया कपमध्ये पुनरागमन करू शकतो. आशिया कपमध्ये धावा करणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यानंतर होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे