
नवी दिल्ली : पुढील महिन्याच्या सुरुवातीस होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवड करण्यापूर्वी सर्व खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा अहवाल विचारात घेतला जाणार आहे. जसप्रीत बुमरा या स्पर्धेसाठी उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळत आहे, मात्र त्यानंतर लगेचच होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.