Asia Cup SL vs AFG : पहिल्याच सामन्यात DRS चा वादग्रस्त बळी

Asia Cup Sri Lanka Vs Afghanistan 1st Match DRS Controversy Video Gone Viral
Asia Cup Sri Lanka Vs Afghanistan 1st Match DRS Controversy Video Gone Viral esakal

Asia Cup SL vs AFG : आशिया कप 2022 ची सुरूवात श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्याने आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झाली. मात्र सामन्याच्या दुसऱ्याच षटकात स्पर्धेतील पहिला वाद उत्पन्न झाला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फझलहक फारूकीने पहिल्याच षटकात श्रीलंकेला मेंडीस आणि असलंकाच्या रूपाने पाठोपाठ दोन धक्के दिले. या दोन धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच नवीन - उल - हक निसंकाला 3 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. (Asia Cup Sri Lanka Vs Afghanistan 1st Match DRS Controversy Video Gone Viral)

Asia Cup Sri Lanka Vs Afghanistan 1st Match DRS Controversy Video Gone Viral
Asia Cup 2022 : शाहीनच्या अनुपस्थितीवर बाबर आझम म्हणाला, जर तो असता तर...

मात्र नवीन - उल - हकने घेतलेला निसंकाचा बळी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नवीनचा चेंडू निसंकाच्या बॅटला चाटून गेला आणि विकेटकिपरच्या ग्लोजमध्ये विसावला. मैदानावरील पंचांनी देखील निसंकाला बाद ठरवले. मात्र निसंकाने DRS घेतला. DRS च्या स्लो मोशन व्हिडिओत निसंकाच्या बॅटजवळून चेंडू जात असताना स्निकोमिटरमध्ये फारशी हालचाल दिसून आली नाही. कोणताही स्पाईक न दिसल्याने सर्वांना वाटले की निसंका नाबाद आहे आणि श्रीलंकेचा DRS फळाला आला. मात्र थर्ड अंपायरने निसंकाला बाद ठरवत सर्वांनाच धक्का दिला.

श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षकांचे चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता. पहिल्याच सामन्याच्या दुसऱ्या षटकात DRS बाबत झालेला हा गोंधळ येणाऱ्या सामन्यांसाठी धोक्याची घंटा आहे. उद्या याच मैदानावर भारत पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे.

Asia Cup Sri Lanka Vs Afghanistan 1st Match DRS Controversy Video Gone Viral
VIDEO | Yuzvendra Chahal : युझवेंद्र - धनश्री ब्रेकअप प्रकरणात कर्णधार रोहितची उडी

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पहिल्या दोन षटकातच श्रीलंकेची टॉप ऑर्डर उडवली. अफगाणिस्तानच्या फैजलहक फारूकीने श्रीलंकेला पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. त्याने कुसल मेंडिसला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकाला शुन्यावर बाद करत दुसरा धक्का दिला. यानंतर दुसऱ्या षटकात नवीन - उल - हकने घेतलेला निसंकाचा वादग्रस्त बळी घेतला. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 5 बाद 3 धावा अशी झाली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com