Asia Cup 2023 : अखेर ACC अध्यक्ष जय शहांनी PCB अध्यक्ष नजम सेठींना दिला दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jay Shah Najam Sethi Asia Cup 2023 ACC

Asia Cup 2023 : अखेर ACC अध्यक्ष जय शहांनी PCB अध्यक्ष नजम सेठींना दिला दिलासा

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या आयोजन आणि यजमानपद यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशिया क्रिकेट काऊन्सिल अर्थात जय शहा यांच्यात शाब्दिक वार पलटवार रंगत होते. जय शहा यांनी आशिया कप 2023 ही त्रयस्थ ठिकाणी होणार अशी घोषणा करताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन नजम सेठी हे नाराज झाले होते. त्यावेळी ACC आणि नजम सेठी यांच्यात शाब्दिक वार पलटवार देखील झाले.

मात्र मध्यंतरी पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी नरमाईची भाषा करत जय शहांच्या भेटीसाठी तगाता लावला होता. अखेर एशियन क्रिकेट काऊन्सीलने नजम सेठी यांची विनंती मान्य केली आहे. आता आशिया कप 2023 संदर्भातील विषयांवर 4 फेब्रुवाराली बेहरीन येथे बैठक होणार आहे.

हेही वाचा: Women IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या क्षणी महिला आयपीएलमधून घेतली माघार

याबाबत नजम सेठी म्हणाले की, 'ही खूप मोठी घडामोड आहे. एशियन क्रिकेट काऊन्सील बोर्ड आशिया कप संदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी 4 फेब्रुवारीला बहरीन येथे बैठक आयोजित करणार आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'मार्चमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे. मी ACC सदस्यांशी दुबईत काय वाटाघाटी झाल्या हे जाहीर करू इच्छित नाही. पुढच्या बैठकीत काय चर्चा होणार हे देखील मी जाहीर करू शकत नाही. मात्र हे नक्की की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध खूप महत्वाचे आहेत.'

पीसीबीची धुरा ज्यावेळी रमीझ राजा यांच्या खांद्यावर होती त्यावेळी जय शहा यांनी आशिया कप 2023 हा पाकिस्तानमध्ये नाही तर त्रयस्थ ठिकाणी होईल असे जाहीर केले होते. त्यावेळी तत्कालीन पीसीबी चेअरमन रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. रमीझ राजा यांनी आशिया कपमधूनही माघार घेण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा: ICC Men's T20I Team : विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या बाबर आझमला आयसीसीचा ठेंगा!

मात्र नवे पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी एसीसी आणि आयसीसी स्पर्धांवर परिणाम होऊ नये म्हणून पाकिस्तान आणि भारत यांच्यातील क्रिकेट संबंधीच्या विषयांवर अजून स्पष्टता असावी हे मान्य केले. ते म्हणाले की, 'यंदाच्यावर्षी आशिया कप आयोजित करणे खूप महत्वाचे आहे. भारताने संघ पाठवणे हा देखली मोठा मुद्दा आहे. कारण याचा पाकिस्तानात 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर देखील दुष्परिणाम होऊ शकतो.'

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?