Asian games 2018 : अपूर्वी-रवीकडून पदक लक्ष्याचा प्रारंभ

पूजा घाटकर
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजीच्या मोहिमेस ब्राँझ पदकाने सुरवात झाली. अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली, पण त्याच वेळी गेल्या काही महिन्यांत वेगाने प्रगती करीत असलेली मनू भाकर आपले सरासरी गुणही नोंदवू न शकल्याने भारतास १० मीटर पिस्तूलच्या दुहेरीत पदकापासून दूर राहावे लागले.

अभिनव बिंद्राचे मार्गदर्शन लाभत असलेल्या रवी कुमारने प्राथमिक फेरीत प्रभावी कामगिरी करीत भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. भारतीय ४२ शॉट्‌सच्या अंतिम फेरीत ४२९.९ गुणांसह दुसरे होते, पण या प्रकारात जागतिक स्तरावर वाक्‌बगार असलेल्या चीनच्या अनुभवी जोडीने भारतास मागे टाकत रौप्यपदक जिंकले व भारतीय जोडीस ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत चित्र बदलते. प्राथमिक फेरीतील आघाडीची कोरियन जोडी चौथी आली.

अंतिम फेरीत अपूर्वीचा खेळ उंचावत असताना अभिषेककडून काही चुका झाल्या. आता हे दडपणाखाली झाले असेल, पण या अनुभवाचा ते फायदा घेतील, याची खात्री आहे.

मनू आणि अभिषेक वर्मा नवोदित आहेत. मनूकडून कायम ३८० पेक्षा जास्त स्कोअरची अपेक्षा असते. तिला ३७८ गुणच मिळवता आले. अभिषेकने ३८१ गुणांची समाधानकारक कामगिरी केली. भारताचे, तसेच कझाकस्तानचे समान ७५९ गुण झाले. कझाकस्तानने जास्त अचूकता (२५-१४) साधत भारतास सहाव्या क्रमांकावर ढकलले.

ट्रॅपमध्ये आश्‍वासक सुरवात
    पुरुषांच्या ट्रॅपमध्ये अनुभवी मानवजित ७२ गुणांसह अव्वल
    लक्ष्य शेरॉन (७५ पैकी ७१) पाचवा - महिला ट्रॅपमध्ये श्रेयासी ७१ गुणांसह दुसरी
    सीमा ७१ गुणांसह चौथी
    अंतिम फेरीत सहा जणांना स्थान

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asian games 2018 Shooting Competition