esakal | Asian Games 2018 : इंडोनेशियाविरुद्ध भारताचा गोलसराव
sakal

बोलून बातमी शोधा

जाकार्ता - आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी महिला हॉकीत इंडोनेशियाविरुद्ध विजय मिळविल्यावर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू.

Asian Games 2018 : इंडोनेशियाविरुद्ध भारताचा गोलसराव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जाकार्ता - भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत आपण सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार आहोत, हे दाखवताना यजमान इंडोनेशियाचा ८-० असा धुव्वा उडवला. चाहत्यांची गर्दी करण्यासाठी संयोजकांनी आपली भारताविरुद्धची लढत पहिल्या दिवशी अखेरची ठेवली, पण इंडोनेशियाला क्वचितच भारतीय गोलक्षेत्रात प्रवेश करता आला.

भारतीय आक्रमक धडाका करीत असल्यामुळे इंडोनेशियावर बचावाचीच वेळ आली. त्यामुळे भारताने गोलशॉटस्‌मध्ये ३०-०, मैदानी गोल प्रयत्नात १२-० आणि पेनल्टी कॉर्नरमध्ये १९-० वर्चस्व राखले. त्यातही भारतीय महिलांनी अखेरच्या काही मिनिटांत ताकद राखून ठेवण्यासाठी जॉगिंग करीतच चाली केल्या आणि इंडोनेशियावर कृपा केली. पहिल्या दोन सत्रांनंतरची ६-० आघाडीनंतर गोलांचा वर्षाव करणे भारतीयांनी टाळले. तरीही यजमानांना चाली करता आल्या नाहीत. 

केवळ यजमान असल्यामुळेच जागतिक क्रमवारीत ६४ वे असलेले इंडोनेशिया या स्पर्धेत खेळत होते. त्यांनी भारताचा क्वचितच कस पाहिला, गुरजितने तीन, नवनीत कौरने दोन; तर बदली खेळाडू म्हणून आलेल्या वंदना कटारियाने दोन आणि उदिताने एक गोल केला. ही लढत भारतीय आक्रमक विरुद्ध इंडोनेशियाची गोलरक्षिका सेली फ्लोरेंटिना अशीच झाली. सेलीने रोखलेले पेनल्टी कॉर्नर मार्गदर्शक शूअर्ड मरीन यांची चिंता वाढवणारे होते.

loading image
go to top