Asian Games 2023 : एका हात मोज्यामुळे आशिया गेम मध्ये झाला होता राडा! चीन-तैवान आले समोरासमोर

Asian Games 2023
Asian Games 2023

Asian Games 2023 : आशियाई गेम्स २०२३ सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत आशियाई गेम्सचा थरार रंगणार आहे, ज्यामध्ये अव्वल खेळाडू आपले श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी चीन मध्ये जाणार आहेत. आशियाई गेम्स मध्ये खेळाडूंच्या संदर्भात अनेक वेळा मोठे प्रसंग घडले आहेत. असाच एक प्रकार २०१० मध्ये घडला होता जेव्हा एका सामन्यानंतर चीन आणि तैवान समोरासमोर आले.

Asian Games 2023
IND Vs PAK Live Score : पाकिस्तानविरुद्ध इशानने ठोकले पहिले अर्धशतक! पांड्याने सांभाळली संघाची धुरा

तैवानची यैंग शू चुन विरुध्द व्हिएतनामच्या वू थी हाऊ यांच्यात झालेल्या तायक्वोंडो सामन्याने वादाची सुरूवात झाली. सामन्याची पहिली फेरी संपायला १२ सेकेंड राहिले होते, त्यावेळी आशियाई तायक्वोंडो फेड्रेशनचे अध्यक्ष जाओ ले यांनी रेफरींना यैंगची टाच तपासण्यास सांगितले, पण रेफरीला काही संशयास्पद आढळले नाही. यानंतर यैंगच्या कोचच्या खुर्ची खाली काय तरी सेंसर दिसला. काही वेळ चर्चा झाली आणि व्हिएतनामच्या वू थी हाऊला १२-० ने विजयी घोषित करण्यात आले.

यैंग आणि तिचे कोच दोघेही ह्या निर्णयावर नाराज होते. दोघेही विरोध दाखवत एक तास मॅट वर बसून राहिले. त्यानंतर वर्ल्ड तायक्वोंडो समितीने त्यांना धमकी दिली की, जर आत्ता तुम्ही मॅट वरुण उठले नाही, तर तुमच्या सगळ्या खेळाडूंना अपाञ करण्यात येईल.

Asian Games 2023
IND Vs PAK Asia Cup 2023 : ढग आले... पाऊस आला अन् भीती होती तेच घडलं! आफ्रिदीच्या तोफेसमोर रोहित-कोहली बुरूज ढासळले

पण त्यावेळी यैंगला अपाञ करण्याचे काही कारण सांगितले नाही, नंतर अहवाल आले की यैंगच्या मोज्यामध्ये सेन्सर होता. सेन्सर बदलण्यात आल्याची माहिती तिच्या संघाला देण्यात आली नसल्याचे यैंग यांनी सांगितले. रेफरीच्या निर्णयाला विरोध केल्याबद्दल, यैंगला महिन्यांनसाठी निलंबित करण्यात आले आणि तिच्या कोचवर 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली.

त्यानंतर मात्र यैंगवर झालेल्या अन्यायानंतर तैवानमध्ये खळबळ उडाली होती. राजकीय पक्षांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच तिला पाठिंबा देण्यास सुरूवात केली. चीनची अॅथलेट सु लिन वेन हिने सुर्वणपदक जिंकल्यावर हा मुद्दा परदेशी ठरला.

खरतर यैंग चे मोजे तपासणारे आशियाईतायक्वोंडो फेड्रेशनचे अध्यक्ष जाओ ले चीनचे होते. तैवानच्या राजकारण्यांनी असा आरोप केला की, यैंग हिला अपाञ ठरवण्यात आले जेणेकरून चीनी जिंकू शकतील. त्याच वेळी चीनने अशा आरोपांना स्पष्टपणे नकार दिला. पराभवामुळे हैराण झालेल्या तैवानचे वर्णन त्यांनी केले. ह्यामुळे दोघांमधील राजकीय संबंध बिघडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com