IND Vs PAK Asia Cup 2023 : ढग आले... पाऊस आला अन् भीती होती तेच घडलं! आफ्रिदीच्या तोफेसमोर रोहित-कोहली बुरूज ढासळले

IND Vs PAK Asia Cup 2023
IND Vs PAK Asia Cup 2023

IND Vs PAK Asia Cup 2023 : श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेटमध्ये डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध हिटमॅनने घाम गाळला असेल, पण चाहत्यांना ज्याची भीती होती तेच घडले. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या तोफेसमोर रोहित-कोहली बुरूज ढासळले. पावसापूर्वी रोहित चांगलाच खेळत होता, पण पाऊस थांबताच हिटमॅनचा डाव आटोपला. रोहितनंतर विराट कोहलीलाही तंबूत गेला.

IND Vs PAK Asia Cup 2023
Asia Cup 2023 Ind vs Pak: 'त्या'ला बाहेर ठेवणे ही टीम इंडियाची सर्वात मोठी चूक...; दिग्गज खेळाडू रोहितवर बरसला

हाय व्होल्टेज सामना पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 27 धावांच्या स्कोअरवर टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 11 धावा करून बाद झाला. तर विराट कोहली 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पावसामुळे हा सामना काही काळ थांबला होता. पण सुरुवात होताच भारताच्या दोन मोठ्या विकेट पडल्या.

IND Vs PAK Asia Cup 2023
Shreyas Iyer Broke Bat : हारिस रौफने श्रेयस अय्यरची बॅटच तोडली, रोहित - विराट बाद झाल्यावर काय झालं 8 व्या षटकात

पहिल्याच षटकात रोहित आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला, पण नंतर शाहीन आफ्रिदीने अखेरीस पाचव्या षटकात रोहित शर्माला झेलबाद केले अन् पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या. यानंतर शाहीन आफ्रिदीने विराट कोहलीच्या रूपाने भारताला दुसरा मोठा धक्का दिला. विराट कोहलीने 4 धावा केल्या.

IND Vs PAK Asia Cup 2023
IND Vs PAK Asia Cup 2023 : ढग आले... पाऊस आला अन् भीती होती तेच घडलं! आफ्रिदीच्या तोफेसमोर रोहित-कोहली बुरूज ढासळले

यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यरही काही विशेष करू शकला नाही, त्याने येताच आक्रमक खेळ दाखवला, पण त्यानंतर हरिस रौफने त्याला फखर झमानच्या हातून झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वृत्त लिहिपर्यंत भारताकडून शुभमन गिल आणि इशान किशन फलंदाजी करत आहेत.

भारताने 11.2 षटकात 3 गडी गमावून 51 धावा केल्या आहेत. शुभमन गिल आणि इशान किशन 2 धावा करून खेळत होते. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. त्यासाठी कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com