India beat Pakistan in Asian Games hockey semi final
India vs Pakistan hockey semi final Asian Games 2026: भारतीय पुरुष हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानने विजयासाठी झुंजवले. ०-३ अशा पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने शेवटच्या टप्प्यात सामना ३-३ असा बरोबरीत आणला, परंतु अगदी शेवटच्या मिनिटाला अभिषेकने केलेल्या गोलमुळे भारत ४-३ असा जिंकला.
गतविजेता म्हणून भारतीय पुरुष हॉकी संघ जपानमध्ये दाखल झाला होता आणि त्यांनी साखळी फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर पाकिस्तानचा फार निभाव लागणार नाही, याची कल्पना होतीच आणि तेच पाहायला मिळाले. हरमनप्रीत सिंगचे (Harmanpreet Singh) दोन गोल आणि सुखजीत सिंगच्या एका गोलने पाकिस्तानला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. भारताला सुवर्णपदकाच्या लढतीत कोरिया विरुद्ध मलेशिया यांच्यातल्या विजेत्याचा सामना करावा लागणार आहे.