Asian Games 2026 : भारतीय तिरंदाजांनी इतिहास रचला, महिला रिकर्व्ह गटात पहिलेवहिले गोल्ड! लव्हलिना बोर्गोहेनचा सुवर्ण'पंच'

Asian Games 2026 India archery and boxing gold medals: आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय महिला तिरंदाजांनी टीम रिकर्व्ह प्रकारात पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.
Asian Games 2026 India archery and boxing gold medals

Asian Games 2026 India archery and boxing gold medals

Updated on: 

India first ever women’s team recurve archery gold Asian Games 2026: भारतीय महिला रिकर्व्ह संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. अंकिता भकत, किर्ती आणि कुमकूम मोहोद यांनी भारताला रिकर्व्ह सांघिक गटातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांनी अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर ५-३ असा विजय मिळवला. भारतीय तिरंदाजांनी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि हे भारताचे ११ वे सुवर्णपदक ठरले. त्यापैकी चार सुवर्णपदकं तिरंदाजीत आली आहेत. बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेन हिने आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com