Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

India men’s kabaddi team wins gold at Asian Games 2026: भारतीय पुरुष कबड्डी संघाने पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महिलांनंतर पुरुष संघानेही इराणला अंतिम सामन्यात पराभूत करत भारताच्या सुवर्णमोहिमेला आणखी एक यश मिळवून दिले.
Asian Games 2026 men’s kabaddi final India vs Iran

Asian Games 2026 men’s kabaddi final India vs Iran

Updated on: 

Asian Games 2026 men’s kabaddi final India vs Iran: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांपाठोपाठ भारतीय पुरुष कबड्डी संघानेही सुवर्णपदक जिंकले. इराणविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमधील पिछाडी भरून काढताना भारताने रोमहर्षक विजय मिळवला. प्रत्येक क्षणाला कूस बदलणाऱ्या या सामन्यात इराणला गतविजेत्यांनी तोडीसतोड उत्तर दिले. भारताने २०१८ वगळल्यास १९९० पासून पुरुष गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. आठ वर्षांपूर्वी इराणने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. भारतीय संघाचे हे पुरुष कबड्डीतील आशियाई स्पर्धेतील नववे सुवर्णपदक ठरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com