Baranica Elangovan historic pole vault medal Asian Games
esakal
India wins 1 gold 2 silver 3 bronze in friday at Asian Games 2026 : भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी १ सुवर्ण, २ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली. नेमबाजीत कमलजीत व सुरुची इंदर सिंग यांनी १० मीटर एअऱ पिस्तूल मिश्र गटात सुवर्णवेध घेतल्यानंतर ५० मीटर एअर थ्री पोझिशन सांघित गटात एपीएस टोमर, रुद्रांक्ष पाटील व निरज कुमार यांनी रौप्यपदक जिंकले. सायंकाळच्या सत्रात मैदानी स्पर्धांमध्ये भारतीयांनी ऐतिहासिक कामगिरी केली. गोळाफेक प्रकारात मनप्रीत कौर हिने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत गुरवीर सिंगने रौप्यपदक पटकावले. बांबू उडीत भारताने आशियाई खेळांमध्ये प्रथमच पदक जिंकण्याचा पराक्रम केला. बारानिका एलंगोवनने कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक भरारी केली.