Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Satnam Singh Salman win bronze in men's double sculls: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली. रोइंगच्या पुरुष डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्यपदक जिंकले.
Asian Games 2026

Satnam Singh Salman Khan win bronze in men's double sculls

esakal

Updated on

Roshibina Devi wins silver medal Asian Games 2026: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये गुरुवारी सकाळच्या सत्रात दोन पदकांची भर घातली. नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात कांस्य पदक जिंकले. नागरागावा आंतरराष्ट्रीय रेगाटा कोर्सवर १५०० मीटरच्या टप्प्यावर ही भारतीय जोडी दुसऱ्या स्थानावर होती, परंतु शेवटच्या ५०० मीटरमध्ये ६:१३.२५ अशी वेळ नोंदवत ती तिसऱ्या स्थानावर घसरली. चीनच्या यी झुडी आणि यिदे नी यांनी ६:०९.३७ वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर उझबेकिस्तानच्या पावेल सोरिन आणि मेखरोझबेक ममातकुलोव यांनी ६:१०.४९ वेळेसह रौप्य पदक पटकावले. ही भारतीय जोडी सुवर्णपदक विजेत्यांपेक्षा ३.८८ सेकंद मागे राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com