Jay Meena wins India’s first soft tennis Asian Games medal
esakal
Jay Meena wins India’s first soft tennis Asian Games medal: जय मीनाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये इतिहास रचला असून, सॉफ्ट टेनिसमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. रोमांचक उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या शेर्विन नुगिटवर मात करून पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पण, त्याला उपांत्य फेरीत कडव्या संघर्षानंतर हार पत्करावी लागली. दुखापतीचा फटका त्याला बसला. उपांत्य फेरीत त्याला जपानच्या टाकुया कुरोसाकाकडून २-४ ( ३-५, १-४, १-४, ४-१, ६-४, १-४) असा पराभव पत्करावा लागला आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले.