Asian Games 2023 : पाकिस्तानने पुन्हा खाली कच! आशिया कपनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत होणार भारत-श्रीलंका फायनल

Asian Games women's cricket India vs Sri Lanka final
Asian Games women's cricket India vs Sri Lanka final
Updated on

Asian Games women's cricket India vs Sri Lanka final : भारतीय महिला क्रिकेट संघाची नजर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. अशाप्रकारे सोमवार २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

Asian Games women's cricket India vs Sri Lanka final
Shreyas Iyer : रोहित शर्मा झाला निर्धास्त; श्रेयस अय्यरचा मौके पे चौका, गिलचाही धुमाकूळ

जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर, त्यांना 20 षटकात केवळ 75 धावा करता आल्या, शवाल झुल्फिकारने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 16 धावा केल्या, तर केवळ 3 खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले. जर आपण श्रीलंकेबद्दल बोललो तर त्याने 17 व्या षटकातच विजय मिळवून आपले पदक निश्चित केले.

आता सोमवारी सुवर्णपदक आणि कांस्यपदकाचे सामने होणार आहेत. सुवर्णपदकाच्या लढतीत भारत आणि श्रीलंका, तर कांस्यपदकाच्या लढतीत बांगलादेश आणि पाकिस्तान भिडणार आहेत. याचा अर्थ आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमधून भारतासाठी पदक निश्चित आहे आणि अंतिम फेरीत टीम इंडिया श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा असेल.

आशिया कपमध्ये सलग पराभव पत्कल्यानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडलेला होता आणि भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप 2023चे विजेतेपद पटकावले.

Asian Games women's cricket India vs Sri Lanka final
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव, ३ रौप्य अन् 2 कांस्यपदक जिंकलं

भारत-श्रीलंका फायनल कधी होणार?

आशियाई क्रीडा 2022 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताने एक सामना जिंकला आणि थेट अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंकेचे संघ आमनेसामने येतील, हा सामना भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com