Shreyas Iyer : रोहित शर्मा झाला निर्धास्त; श्रेयस अय्यरचा मौके पे चौका, गिलचाही धुमाकूळ

Shreyas Iyer Shubman Gill
Shreyas Iyer Shubman Gillesakal
Updated on

Shreyas Iyer Shubman Gill : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत स्मिथचा हा निर्णय फोल ठरवला.

गेल्या सामन्यातील स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड 8 धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी 200 धावांची भागीदारी रचली. भारताने 30 षटकाच्या आतच 200 धावांचा टप्पा पार केला. श्रेयस अय्यर आणि गिलने शतकी खेळी केली. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या अय्यरने मिळालेल्या संधीचं सोनं करत शतकी खेळी केली.

Shreyas Iyer Shubman Gill
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव, ३ रौप्य अन् 2 कांस्यपदक जिंकलं

श्रेयस अय्यर अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. त्याने पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघात पुनरागमन केले. मात्र कर्णधार रोहित शर्माला त्याच्या फॉर्मची चिंती होती. ही चिंता त्याने आज ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिटवली.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत 86 चेंडूत शतकी खेळी केली. त्याने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी रचली. मात्र 90 चेंडूत 105 धावा करत अय्यर बाद झाला.

Shreyas Iyer Shubman Gill
Asian Games 2023 : अरविंद सराव करू शकला नव्हता तरी देशाला जिंकून दिलं सिल्वर

अय्यरनंतर शुभमन गिलने देखील आपले शतक 92 चेंडूत पूर्ण केले. विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या आदल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये भारताकडून शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली आहे. त्यामुळे वर्ल्डकपपूर्वी भारताचे सर्व फलंदाज फॉर्ममध्ये आल्याचे आपण म्हणू शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com