Asian Hockey Cup 2025: शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंगला संधी; आशियाई हॉकी करंडक, भारताचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे कायम
Indian Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून बिहारमधील राजगिर येथे २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान आशियाई हॉकी करंडक होणार आहे. हरमनप्रीत सिंगकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्यात आले असून शिलानंद लाक्रा व दिलप्रीत सिंग यांना संधी मिळाली आहे.
नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाची बुधवारी (ता. २०) निवड करण्यात आली. बिहारमधील राजगिर येथे २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.