Asian Games : कुस्तीपटूंची निवड चाचणी अधांतरी; खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख १५ जुलै

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहभागावर परिणाम होण्याची शक्यता
Asian Games : कुस्तीपटूंची निवड चाचणी अधांतरी; खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख १५ जुलै
Updated on

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी घ्यावी लागणार आहे.

भारतीय खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे; मात्र बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे भारतातील काही कुस्तीपटूंनी निवड चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Asian Games : कुस्तीपटूंची निवड चाचणी अधांतरी; खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख १५ जुलै
Asia Cup 2023 : आशिया कपच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

आशियाई ऑलिंपिक काऊन्सिलकडे याबाबत पत्रही पाठवण्यात आले आहे, पण त्यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच भारतीय ऑलिंपिक संघटनेची ॲड हॉक समितीची मंगळवारी बैठक होऊनही निवड चाचणीची तारीख निश्‍चित झालेली नाही.

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्ली येथे ३८ दिवसांचे आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कुस्तीच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

शारीरिक तंदुरुस्तीकडेही त्यांना लक्ष देता आले नाही. याच कारणामुळे त्यांनी निवड चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली.

आयओएकडून आशियाई ऑलिंपिक काऊन्सिलकडे १५ जुलैपर्यंत खेळाडूंच्या नावांची यादी द्यावयाची आहे, पण आयओएकडून १० ऑगस्टपर्यंतची मुदत मागण्यात आली आहे.

Asian Games : कुस्तीपटूंची निवड चाचणी अधांतरी; खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख १५ जुलै
Fitness Secret : म्हणूनच जपानी लोक असतात फिट अन् स्लिम, वाचा सीक्रेट

दोन दिवसांची प्रतीक्षा

आयओएच्या ॲड हॉक समितीचे भूपेंदर सिंह बाजवा याप्रसंगी म्हणाले, आशियाई ऑलिंपिक समितीकडून दोन दिवसांमध्ये उत्तर येण्याची अपेक्षा आहे. आम्हाला संघ पाठवण्यासाठी जास्त दिवसांची मुभा देण्यात येईल याची शाश्‍वती नाही, पण आमची मागणी मान्य होईल असे वाटते. दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

आयओएच्या ॲड हॉक समितीमध्ये गियान सिंह यांचीही निवड करण्यात आली आहे. या वेळी ते म्हणाले, आज आमची बैठक पार पडली. त्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Asian Games : कुस्तीपटूंची निवड चाचणी अधांतरी; खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख १५ जुलै
indian-wrestlers : योगेश्‍वर-विनेशमध्ये शाब्दिक ‘कुस्ती’

हंगामी समितीत फूट

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक होईपर्यंत आयओएकडून हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये भूपेंदर सिंह बाजवाल, गियान सिंह व सुमा शिरुर यांचा समावेश आहे, पण या समितीत फूट पडल्याचे निदर्शनास येत आहे.

भूपेंदर स्वत: निर्णय घेत आहेत. ते कुणाशीही चर्चा करीत नाहीत, असा आरोप गियान सिंह यांनी केला आहे. तसेच माझी हंगामी समितीत निवड केल्यापासून सुमा शिरुर यांच्याशी भेट झालेली नाही.

सोनिपतच्या निवड चाचणीत त्यांच्याशी भेट झाली होती, पण त्याव्यतिरिक्क त्यांना भेटलेलो नाही. बैठकांमध्येही त्यांची अनुपस्थिती असते, असे गियान सिंह यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, सुमा शिरुर राष्ट्रीय रायफल नेमबाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. यामुळे सुमा शिरुर यांना ॲड हॉक समितीसाठी वेळ देता येत नसावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com