Asif Ali Announces Sudden Retirement Ahead of T20 World CupEsakal
क्रीडा
आशिया कप स्पर्धेतून वगळलं, पाकिस्तानच्या ३३ वर्षीय फिनिशरनं तडकाफडकी निवृत्ती घेतली; T20 World Cup आधी संघाला धक्का
Asif Ali Retirement : पाकिस्तान क्रिकेट संघाला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी मोठा धक्का बसलाय. संघाचा फिनिशर अशी ओळख असलेल्या क्रिकेटरनं अचानक निवृत्ती जाहीर केलीय.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या ३३ वर्षीय फलंदाजानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. आशिया कप २०२५साठी संघात निवड न झाल्यानं रागाच्या भरात त्यानं हा निर्णय घेतला अशल्याचं सांगण्यात येतंय. असीफ अलीने पाकिस्तानकडून २१ एकदिवसीय आणि ५८ टी२० सामने खेळले आहेत. त्यानं सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

