Asia Cup 2023 : डाव साधणार! पाकिस्तानकडून आशिया कपचे आयोजक पद काढून घेणार?

Attack On Imran Khan Asia Cup 2023
Attack On Imran Khan Asia Cup 2023esakal

Asia Cup 2023 Attack On Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरूवारी जीवघेणा हल्ला झाला. इम्रान खान पंजाब प्रांतात लाँग मार्च करत होते. त्यावेळी त्यांच्या कंटनेरवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हा गोळीबार एके 47 मधून करण्यात आला की पिस्तुलातून करण्यात आला हे अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला गोळ्या लागल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर क्रिकेट वर्तुळातून आशिया कप 2023 पाकिस्तानातून हलवून एका त्रयस्थ ठिकाणी घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Attack On Imran Khan Asia Cup 2023
भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

इम्रान खान यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे. सध्या तरी या हल्ल्याची कोणत्या दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. इम्रान खान सध्याच्या सरकारविरूद्ध लाँग मार्च काढला आहे. ही रॅली राजधानी इस्लामाबाद येथे जाणार होती. दरम्यान, इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे कळते. इम्रान खान यांच्यावर हल्ला होताच भारतात आशिया कप 2023 हा ट्रेंड करू लागला. यावर क्रिकेट चाहते आपले मत व्यक्त करत होते.

एका चाहत्याने 'आशिया क्रिकेट काऊन्सिलने (ACC) त्वरित आशिया कप 2023 पाकिस्तानातून भारतात, बांगलादेशमध्ये किंवा श्रीलंकेत शिफ्ट करावा. जिथे माजी पंतप्रधानच सुरक्षित नाहीत तिथे खेळाडू सुरक्षित राहतील असं तुम्ही कसं म्हणू शकता.' असे ट्विट केले. दरम्यान, आशिया क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांनी काही दिवसांपूर्वीच भारत आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही असे स्पष्ट वक्तव्य केले होते. आता जय शहा यांनी आपली भुमिका पटवून देण्यासाठी मुद्दा मिळाला आहे.

Attack On Imran Khan Asia Cup 2023
Sunil Gavaskar : गावसकर म्हणतात, भारत जिंकला नाही तर बांगलादेश हरलं!

दरम्यान, इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर आता आयर्लंडचा महिला क्रिकेट संघ पाकिस्तानचा दौरा सुरू ठेवण्याबाबत परिस्थितीचे आकलन करून निर्णय घेणार आहे. आयर्लंडचा महिला संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. मालिकेतील पहिला सामना लाहोरमध्ये होणार होता. तेथूनच 150 किमी अंतरावर असणाऱ्या वजीराबाद येथे इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला आहे.

याबाबत पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैसल हसनैन यांनी आयर्लंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन ड्यूट्रोम यांच्याशी आणि संघ व्यवस्थापक बेथ हिली यांच्याशी चर्चा केली. आयर्लंडचा महिला संघ सध्या पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियमवर सराव करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com