
दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मागील दोन सामन्याला मुकलेला रोहित शर्मा संघात आल्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाची ताकद आणखी वाढली आहे.
Aus vs Ind 3rd Test In Sydney : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनीतील तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत उर्वरित दोन सामन्यात विजय नोंदवून मालिका विजयाचा इतिहास रचण्यासाठी संघ उत्सुक असेल.
गुरुवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.30 वाजल्यापासून तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. यासाठी बुधवारीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली. दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मागील दोन सामन्याला मुकलेला रोहित शर्मा संघात आल्यामुळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाची ताकद आणखी वाढली आहे. रोहितच्या कमबॅकमुळे मागील दोन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या मयांक अगरवालला बाकावर बसण्याची वेळ आली आहे.
''भारतीय गोलंदाजांसमोर धावा करणे कठीण''
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. विराटच्या नेतृत्वाखाली धक्कादाय पराभवानंतर अजिंक्य राहणेच्या खांद्यावर मोठे ओझे असल्याचे बोलले गेले. तो हे मोठे आव्हान पेलणार का? अशा प्रश्नही निर्माण करण्यात आला. मात्र मेलबर्नच्या मैदानात कर्णधाराला साजेसा खेळ करुन दाखवत अजिंक्यने भारतीय संघाला 4 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधून देण्यात मोलाच योगदान दिले.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत(यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी (DUBUT)