अ‍ॅशेस मालिका : सॅण्ड पेपरवरून डिवचणाऱ्यांना वॉर्नरचे प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी स्मिथ रडतानाचे मुखवटे व टी-शर्ट परिधान करून त्याला चिडवण्याच्या प्रयत्न केला होता. तसेच डेव्हिड वॅार्नर व बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर देखील प्रेक्षकांनी सॅण्ड पेपर दाखवले होते.

बर्मिंगहम : सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. मागील वर्षी बंदी घालण्यात आलेले डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांना या मालिकेत ऑस्ट्रेलियाने संघात संधी दिली आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक त्यांना सतत डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. 

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी स्मिथ रडतानाचे मुखवटे व टी-शर्ट परिधान करून त्याला चिडवण्याच्या प्रयत्न केला होता. तसेच डेव्हिड वॅार्नर व बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर देखील प्रेक्षकांनी सॅण्ड पेपर दाखवले होते.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी डेव्हिड वॉर्नरला प्रेक्षकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. वॅार्नर मैदानात क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी "तुझ्या खिशात सॅण्ड पेपर तर नाही ना?'' असा सवाल वॉर्नरला केला. त्यावर आपले दोन्ही खिसे बाहेर करत ते खाली असल्याचे वॅार्नरने प्रेक्षकांना दाखवले.  

आज (रविवार) चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 160 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात वॉर्नर केवळ 8 धावा काढून तंबूत परतला. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने दोन्ही डावांत शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले असून स्मिथ आणि वेड हे अनुक्रमे 110 आणि 23 धावांवर खेळत होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I LOVE HIM #Ashes

A post shared by Aussie Aussie Aussie (@63notout.forever) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aussi Plyaer David Warners Brilliant Response To Sandpaper Chants