पाक दौऱ्यातून माघारीच्या सावटाखालीच ऑस्ट्रेलिया संघाची झाली घोषणा | Australia 18 men Test Squad Announce For Historical Pakistan Tour | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia 18 men Test Squad Announce For Historical Pakistan Tour
पाक दौऱ्यातून माघारीच्या सावटाखालीच ऑस्ट्रेलिया संघाची झाली घोषणा

पाक दौऱ्यातून माघारीच्या सावटाखालीच ऑस्ट्रेलिया संघाची झाली घोषणा

कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून अनेक दिग्गज खेळाडू माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच आता 18 सदसीय कसोटी संघाची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) केली. या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स (Pat Cummins) करत आहे. तर उपकर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) निवड करण्यात आली आहे. याचबरोबर मुळचा पाकिस्तानी असलेल्या उस्मान ख्वाजाचीही (Usman Khawaja) अॅशेस मालिकेतील दमदार कामगिरीनंतर संघात वर्णी लागली आहे.

हेही वाचा: Propose Day 2022 : 'नारायण..नारायण...' KKR नं केली फिरकीपटूची गंमत

ऑस्ट्रेलिया (Australia Mens Cricket Team) ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यावर 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 मार्चला रावळपिंडी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी 12 मार्चला कराचीत तर तिसरी कसोटी 21 मार्चला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही देशात 4 वनडे सामन्यांची मालिका देखील होणार आहे.

हेही वाचा: U19 विजेतेपदाने हुरळून गेलो नाही; IPL बाबत यश धुलचे मोठे वक्तव्य

या वनडे मालिकेतील पहिला सामना 29 मार्च, दुसरा सामना 31 मार्च, तिसरा सामना 2 एप्रिल आणि चौथा सामना 5 एप्रिलला होणार आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने हे रावळपिंडी क्रिकेट स्डेडियमवर होणार आहेत.

Web Title: Australia 18 Men Test Squad Announce For Historical Pakistan Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..