
Australia T20I squad for India tour : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाचे शेड्यूल पूर्णपणे पॅक आहे. वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडियाचे लक्ष टी-20 वर असणार आहे. कारण टी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षी म्हणजे 2024 ला खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया या स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेपासून सुरू करणार आहे. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून भारतात खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघाची घोषणा केली आहे.
दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने डेव्हिड वॉर्नरच्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅश्टन अगर दुखापतीमुळे या मालिकेचा भाग होणार नाही. ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अॅश्टन अगरला दुखापत झाली होती. याशिवाय वर्ल्ड कप खेळणाऱ्या काही खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये होणार आहे. तिसरा T20 सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल. यानंतर चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला नागपुरात तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ :
मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.