World Cup 2023 : 'नंबर 1 खेळाडू तोच असतो जो संघाला...' पाक कर्णधार बाबर आझमवर संतापला गौतम गंभीर
Gautam Gambhir Angry on Babar Azam : पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपचा सहावा सामना खेळत दक्षिण आफ्रिकेने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. दोन्ही संघांमध्ये काल चेन्नईत रोमांचक सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात होता, मात्र अखेरीस दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमववर भारतीय दिग्गज गौतम गंभीर चांगलाच संतापला.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, नंबर आणि रँकिंग वाढलेली आहे. पण नंबर 1 खेळाडू तोच असतो जो त्याच्या संघाला विजय मिळवून देतो. अर्धशतक झळकावूनही बाबर आझमला मोठी खेळी खेळता आली नाही.
या सामन्यात बाबर आझमला केवळ 50 धावा करता आल्या. या वेळात त्याने 65 चेंडूंचा सामना केला. खराब शॉट खेळल्यामुळे तो झेल बाद झाला.
शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, बाबरने श्रीलंकेविरुद्ध 10, भारताविरुद्ध 50, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18, अफगाणिस्तानविरुद्ध 74 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 धावा केल्या. यापैकी फक्त एकच सामना पाकिस्तानने जिंकला.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. या स्पर्धेत संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. आतापर्यंत तिला 6 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. गुणतालिकेत त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. संघ 4 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. नेट रन रेटही मायनसमध्ये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.