
AUS vs SA: दुखापतींनी त्रस्त ऑस्ट्रेलियासमोर आफ्रिकेने पुन्हा एकदा टाकली नांगी
Australia beat South Africa : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना एक डाव आणि 182 धावांनी जिंकला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू दुखापतींनी हैराण झाले होते, मात्र असे असतानाही दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्याशी टक्कर देऊ शकला नाही.
पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या कॅमेरून ग्रीनने दुःख त्या हाताने अर्धशतक ठोकले, पण दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. तिसऱ्या कसोटीतूनही तो बाहेर पडला आहे. मिचेल स्टार्कलाही बोटाला दुखापत झाली, दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याच्या बोटातून रक्त येत होते, तरीही त्याने गोलंदाजी सुरूच ठेवली.
हेही वाचा: IND vs SL: निवडकर्त्यांच्या निर्णयामुळे 'या' खेळाडूची टी-20 कारकीर्द संपली!
याशिवाय, डेव्हिड वॉर्नर 200 धावा केल्यानंतर दुखापतग्रस्त झाला, तरीही तो सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 204 धावांत गारद झाला. नॅथन लायनने तीन तर स्कॉट बोलंडने दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात टेंबा बावुमाने सर्वाधिक 65 धावांचे योगदान दिले. 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या वॉर्नरला त्याच्या 200 धावांच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
हेही वाचा: IND vs SL: नवीन वर्ष नवा कर्णधार! जाणून घ्या वेळापत्रक अन् सर्वकाही...
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या 189 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आठ विकेट्सवर 575 धावा करून डाव घोषित केला. वॉर्नरशिवाय अॅलेक्स कॅरीने 111 धावांचे योगदान दिले तर स्टीव्ह स्मिथने 85 धावा केल्या. ग्रीनने नाबाद 51 आणि ट्रॅव्हिस हेडने झटपट 51 धावा केल्या. चौथ्या दिवशीच सामना संपला. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.