IND vs SL: निवडकर्त्यांच्या निर्णयामुळे 'या' खेळाडूची टी-20 कारकीर्द संपली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs sl r ashwin out of team india t20 squad

IND vs SL: निवडकर्त्यांच्या निर्णयामुळे 'या' खेळाडूची टी-20 कारकीर्द संपली!

India vs Sri Lanka T20 Series : टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी टी-20 विश्वचषक 2024 डोळ्यासमोर ठेवून छोट्या फॉरमॅटमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत टी-20 संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे, तर एकाही वरिष्ठ खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही. हा खेळाडू 2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होता.

हेही वाचा: Rishabh Pant : कसोटी मालिका महत्त्वाची; गुडघ्याची ताकद वाढवा; BCCI ने 'फिट' पंतला सोडले फर्मान!

श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विनला या मालिकेत आपले स्थान निर्माण करता आलेले नाही. आर अश्विनने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता, परंतु या स्पर्धेनंतर तो टी-20 क्रिकेटमध्ये दिसला नाही. तो आता टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळेल की नाही, याबाबत काहीही सांगता येत नाही.

हेही वाचा: Women's T20 WC 2023 : नववर्षात भारत पाक सामन्याची मेजवाणी; टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

टीम इंडियाने यावर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या दौऱ्यावर आर अश्विनने टी-20 संघात पुनरागमन केले. आर अश्विन आशिया चषक 2022 मध्येही खेळला होता. मात्र 2022 च्या टी-20 विश्वचषकात तो आपली छाप सोडू शकला नाही. या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांमध्ये त्याने 8.15 च्या इकॉनॉमीसह धावा केल्या आणि त्याला फक्त 6 विकेट मिळवता आल्या.

हेही वाचा: Arshdeep Singh : अर्शदीप सिंग! टी 20 पाठोपाठ वनडे संघात स्थान आता... ICC ने दिली आनंदाची बातमी

अश्विनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 65 टी-20 सामन्यात 62 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी तो भारतासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने टीम इंडियासाठी 88 कसोटी सामने खेळताना 449 विकेट्स घेतल्या आहेत, तर 113 वनडेत 151 बळी घेतले आहेत.