Video: पाकवर कांगारूंचा ऐतिहासिक विजय; वॉर्नरने नक्कल करत हसन अलीची जिरवली | Australia Defeat Pakistan David Warner copy Hasan Ali Style | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Defeat Pakistan David Warner copy Hasan Ali Style

Video: पाकवर कांगारूंचा ऐतिहासिक विजय; वॉर्नरने नक्कल करत हसन अलीची जिरवली

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 115 धावांनी पराभव केला. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानात 24 वर्षानंतर खेळली गेलेली ऐतिहसिक कसोटी मालिका जिंकली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) हसन अलीची (Hasan Ali) केलेली नक्कल सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Video Viral) होत आहे.

लाहोर कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान आपला दुसरा डाव खेळत होता. त्यावेळी पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अली फलंदाजी करत होती. मात्र नॅथन लिओनला स्वीप मारण्याच्या नादात तो बोल्ड झाला. तो मजेशीररित्या बोल्ड झाल्याने सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही विकेट चांगलीच सेलिब्रेट केली. दरम्यान, सिली पॉईंटला उभ्या असलेल्या डेव्हिड वॉर्नरने हसन अलीच्या स्टाईलमध्येच सेलिब्रेशन केले.

डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तान दौऱ्यावर बऱ्याच कलाकारी करत फॅन्सचे मन जिंकले आहे. त्याने शाहीन आफ्रिदीला खोटी खोटी खुन्नस देत कसोटी सामन्यात चांगलीच रंगत भरली होती. याचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. आता हसन अलीची कॉपी करून त्याने चाहत्यांची पुन्हा एकदा मने जिंकली.

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 391 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानचा पहिला डाव 268 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 123 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 227 धावा करत पाकिस्तासमोर 351 धावांचे टार्गेट ठेवले. मात्र पाकला दुसऱ्या डावात 235 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनने 5 विकेट घेत पाकिस्तानला धूळ चारली.

Web Title: Australia Defeat Pakistan David Warner Coppy Hasan Ali Style To Celebrate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top