Marcus Stoinis Injury : भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टोयनिस-वॉर्नर बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Warner, Stoinis out of third ODI against New Zealand

Marcus Stoinis Injury : भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टोयनिस-वॉर्नर बाहेर

Australia vs New Zealand 3rd ODI David Warner Marcus Stoinis : ऑस्ट्रेलियाचे स्टार अष्टपैलू मार्कस स्टोयनिस आणि डेव्हिड वॉर्नर हे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर. डेव्हिड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी स्टोयनिस दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. जर स्टोयनिस वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर तो भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो. भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का असेल.

हेही वाचा: Indw vs Engw : महाराष्ट्राची लेक किरण नवगिरे करणार पदार्पण? इंग्लंडविरुद्ध भारतची Playing-11

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मार्कस स्टोयनिसने फक्त सहा चेंडू खेळले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त तीन ओव्हर टाकली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 113 धावांनी जिंकला. न्यूझीलंडच्या डावाच्या 23व्या षटकात जिमी नीशमची विकेट घेतल्यानंतर स्टोयनिसने स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदान सोडले आणि तो मैदानात परतला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, स्टोयनिसने पर्थमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान तीन टी-20 सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर जायचे आहे. या मालिकेपूर्वी स्टॉइनिसला तंदुरुस्त होण्यासाठी एक आठवडा आहे. वॉर्नरला दुखापत झालेली नाही.

हेही वाचा: Virat Kohli: विराटच्या शतकानंतर CSK चे ट्विट व्हायरल; 'किंग परत आला, पण तो...'

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसर्‍या सामन्यात अॅरॉन फिंच शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ भारतासाठी रवाना होईल. टी-20 मालिकेतही फिंच संघाचा कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 20 सप्टेंबरपासून मोहालीत मोहीम सुरू करणार आहे.

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

अ‍ॅरोन फिंच , पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, अ‍ॅश्टन एगर, जोश हेझलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा, कॅमेरून ग्रीन.

Web Title: Australia Injured Marcus Stoinis Ruled Out New Zealand David Warner Also Out Of Team Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..