Virat Kohli: विराटच्या शतकानंतर CSK चे ट्विट व्हायरल; 'किंग परत आला, पण तो...'

विराटच्या या शतकानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने काही वेगळेच ट्विट केले आणि हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
CSK special tweet for Virat Kohli
CSK special tweet for Virat Kohli

CSK special tweet for Virat Kohli viral : आशिया कप 2022 मध्ये भारताची कामगिरी काही खास नव्हती. टीम इंडियाला सुपर-4 मध्ये आधी पाकिस्तान नंतर श्रीलंकेकडून पराभूत करून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. मात्र विराट कोहली या स्पर्धेत आपल्या जुन्या लयमध्ये परतला आहे. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावणाऱ्या विराटने शेवटच्या सामन्यात नाबाद शतक ठोकले. विराटने 1020 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शतक झळकावले. विराटच्या या शतकानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने काही वेगळेच ट्विट केले आणि हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

CSK special tweet for Virat Kohli
Asia Cup नंतर 'या' दोन संघांचा सामना करण्यासाठी Team India सज्ज, पहा शेड्यूल

विराटचा एक फोटो शेअर करत चेन्नई टीमने लिहिले की, "किंग परत आला आहे, ते हे म्हणत आहेत, पण तो कधीच सोडून गेला नव्हता. यासोबतच विराटचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो कसोटी शतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यासोबत फोटोच्या मागील बाजूस पोरकांडा सिंघम असे लिहिले आहे.

विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्यांदा शतक झळकावले. त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. यासह तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला. त्याच्या आधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने 118 धावा केल्या होत्या. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतके झळकावली आहेत आणि सर्वाधिक शतकांच्या बाबतीत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. रिकी पाँटिंगनेही 71 शतके ठोकली असून सचिनने सर्वाधिक 100 शतके झळकावली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com