Ashes 2019 :  ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; चेंडू कुरतडणाऱ्या बॅंक्रॉफ्टचे पुनरागमन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जुलै 2019

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रत्यक्ष चेंडू कुरतडणारा कॅमरॉन ब्रॅंक्रॉफ्टला संघात स्थान देण्यात आले आहे. 

लंडन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रत्यक्ष चेंडू कुरतडणारा कॅमरॉन ब्रॅंक्रॉफ्टला संघात स्थान देण्यात आले आहे. 

ऑस्ट्रेलियाने मायेल नेसर याला पदार्पणाची संधी दिली आहे. केप टाऊन येथे झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरॉन ब्रॅंक्रॉफ्ट यांची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड झाली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा संघ : टीम पेन (कर्णधार), कॅमरॉन ब्रॅंक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिशेल मार्श, मायकेल नेसर, जेम्स पॅटीन्सन, पिटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia name 17 players squad for Ashes series