

FIFA World Cup 2026
esakal
व्हॅनकूवर (कॅनडा) : नेस्टोरी इराणकुंडा व कॉनर मेटकाल्फ यांनी केलेले शानदार गोल आणि २२ वर्षीय गोलरक्षक पॅट्रिक बीच याचा भक्कम बचाव याच जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी सकाळी झालेल्या लढतीत तुर्कीये संघावर २-० असा दणदणीत विजय मिळवला. फुटबॉल विश्वकरंडकातील हा पहिला धक्कादायक निकाल ठरला.