esakal | Aus vs Ind 4th Test, Day 1 : धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियाने धावफलकावर लावल्या 5 बाद 274 धावा
sakal

बोलून बातमी शोधा

AUSvsIND 4th Test

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय

Aus vs Ind 4th Test, Day 1 : धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियाने धावफलकावर लावल्या 5 बाद 274 धावा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

Australia vs India 4th Test Day 1 :  मार्नस लाबुशेनचे शतक आणि मेथ्यू वेडनं त्याला दिलेली साथ याच्या जोरावर पहिल्या दिवशी खराब सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.  चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 274  धावा केल्या आहेत. कर्णधार टिम पेन 38 (62) आणि कॅमरुन ग्रीन 28(70) नाबाद आहेत. मोहम्मद सिराजने टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली. वॉर्नरला त्याने अवघ्या एका धावेवर तंबूत धाडले.  

शार्दुल ठाकूरने मार्कस हॅरिसला 5 धावांवर चालते केले. सलामीवीर थोडक्यात आटोपल्यानंतर लाबुशेन-स्मिथ जोडीनं संघाचा जाव सावरला. या दोघांची जोडी सेट होत असल्याचे दिसत असताना वाशिंग्टन सुंदरने स्मिथला झेलबाद केले. रोहित शर्माने त्याचा उत्तम झेल टिपला. मॅथ्यू वेडच्या रुपात टी नटराजनने कसोटीतील पहिली विकेट घेतली. शतकवीर लाबुशेनलाही त्याने 108 धावांवर तंबूत धाडले. पहिल्या दिवशी अर्धा संघ परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने धावफलकावर लावलेली 274 या धावसंख्येत ते दुसऱ्या दिवशी किती धावांची भर घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना बिस्बेनच्या मैदानात सुरु आहे.  ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीला बसलेल्या धक्क्यातून सावरत मार्नस लाबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी डाव सावरला. स्मिथ परतल्यानंतर मॅथ्यू वेडनेही लाबुशेनला चांगली साथ दिली. त्यामुळे सुरुवात चांगली करुनही भारतीय संघ कुठेतरी मागे पडला आहे.   भारतीय संघात या सामन्यात मोठे बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शार्दूल ठाकूर, मयांक अग्रवाल, नटराजन आणि वाशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली. टी नटराजन आणि वाशिंग्टन यांनी पहिल्या सामन्यात विकेट मिळवण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे नवदीप सैनीची दुखापत संघाची धकधक वाढवणारी अशी आहे.  

लाईव्ह अपडेट्स

213-5 : मार्नस लाबुशेनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला 5 वा धक्का, 108 धावांवर नटराजनने केलं चालतं

200-4 : ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, वेड रुपात 45 (87) नटराजनला मिळाली कसोटीतील पहिली विकेट 

87-3 : स्टीव्ह स्मिथच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का, वाशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर रोहितनं घेतला झेल

17-2 : हॅरिसला माघारी धाडत शार्दुलन टीम इंडियाना मिळवून दिलं दुसरं यश

4-1 सिराजने घेतली वॉर्नरची विकेट. टीम इंडियाची दमदार सुरुवात

loading image
go to top