esakal | मेग्रासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल | Australia Women vs India Women
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Women vs India Women

मेग्रासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल

sakal_logo
By
सुशांत जाधव

तालिया मेग्राच्या जबदस्त बॅटिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-20 सामना जिंकत मल्टी सीरीज आपल्या नावे केली. भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघासमोर 119 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एलिसा हेली 4, बेथ मूनी 34 (36) आणि मेग लेनिंग 15 धावा करुन माघारी फिरल्यानंतर गार्डनर आणि पेरी स्वस्तात माघारी फिरल्या.

सामना भारताच्या बाजूनं फिरला होता. पण अवघ्या एका सामन्याचा अनुभव गाठीशी असलेल्या मेग्राने सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं वळवला. एका बाजूनं विकेट पडत अशताना मेग्रानं 33 चेंडूत नाबाद 42 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. भारतीय संघाकडून शिखा पांड्येनं सर्वाधिक 3, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि शिखा पांड्ये यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हेही वाचा: पूजा-हरमनप्रीतची मोजकी खेळी ऑस्ट्रेलियन महिला संघाला भारी पडणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये तीन वनडे, एक कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मल्टी फॉर्मेट सीरिज खेळवण्यात आली होती. वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 असा विजय नोंदवला होता. डे नाईट कसोटी मालिका अनिर्णित राहिला होता. पहिल्या टी-20 सामन्यावर पावसाने पाणी फेरल्यानंतर दुसरा टी-20 सामना जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघाने ही सीरीज आपल्या नावे केले. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळवण्यात येईल. सीरिज गमावल्यानंतर भारतीय महिला संघ शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

हेही वाचा: ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध बलात्काराचा आरोप; ही आहे अपडेट

दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीची बॅटर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांना नावाला साजेसा खेळ करता आला नाही. स्मृती मानधना एक तर शफाली अवघ्या तीन धावा करुन माघारी फिरली. या दोघींचा फ्लॉप शो भारतीय संघासाठी चांगलाच महागात पडला.

loading image
go to top