esakal | ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध बलात्काराचा आरोप; ही आहे आताची अपडेट
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध बलात्काराचा आरोप; ही आहे अपडेट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमेरिका : प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून न्यायालयात प्रकरण सुरू आहे. माजी मॉडेल कॅथरीन मॉर्गेन हिने २००९ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून हे प्रकरण सुरू आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या न्यायाधीशाने रोनाल्डोविरुद्धचे प्रकरण बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. रोनाल्डोने लैंगिक छळाचे आरोप फेटाळले होते. त्याच्याविरुद्धचा खटला दोन वर्षांपूर्वी वगळण्यात आला होता, हे विशेष...

कॅथरीन मॉर्गेनने रोनाल्डोविरुद्ध सिविल तक्रार दाखल करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. तसेच कॅथरीनने २०१० मध्ये न्यायालयाबाहेर रोनाल्डोसोबत तोडगा काढल्याचा दावाही केला होता. तसेच २०१८ मध्ये ‘MeToo’ चळवळीने प्रेरित होऊन कॅथरीन रोनाल्डोविरुद्ध उघडपणे बोलली होती. प्रकरण निकाली काढण्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोने २०१० मध्ये कॅथरीनला २.८१ कोटी रुपये दिले होते. कॅथरीनने पैसे घेतल्यानंतरही लास वेगासमध्ये खटला दाखल केला आणि ४२० कोटींची मागणी केली होती.

या आठवड्यात झालेल्या सुनावणीत दंडाधिकारी न्यायाधीश डॅनियल अल्ब्रेगेट्स यांनी रोनाल्डोविरुद्धचा खटला बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारस केली. आता न्यायाधीश अल्ब्रेगेटच्या शिफारशीचे स्वतंत्र न्यायाधीशांकडून समीक्षा केली जाणार आहे. ते या खटल्याची सुनावणी करीत आहे. रोनाल्डोचे वकील पीटर क्रिस्टियनसन यांनी या शिफारशीचे स्वागत केले आहे.

हेही वाचा: सुंदर तरुणी दिवसा करतात स्टाफच काम, रात्री करतात देहव्यापार

जे ही झाले ते दोघांच्या संमतीने

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कॅथरीन मॉर्गेन हिने २००९ मध्ये लास वेगासमधील हॉटेलमध्ये बलात्कार केलाचा आरोप केला होता. या आरोपाचे रोनाल्डोने खंडन करीत जे काही झाले ते दोघांच्या संमतीने झाल्याचे म्हटले होते. असे असले तरी कॅथरीनने रोनाल्डोविरुद्ध तक्रार दाखल केली.

loading image
go to top