Aaron Finch Retires: शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अ‍ॅरोन फिंच बोल्ड; चाहते भावूक - Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaron Finch Retires

Aaron Finch Retires: शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अ‍ॅरोन फिंच बोल्ड; चाहते भावूक - Video

Aaron Finch Retires from ODI : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना केर्न्स येथील कॅजेली स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने या फॉरमॅटमधील कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला आहे. अॅरॉन फिंचने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे. शेवटच्या एक दिवसीय सामन्यात त्याला कोणतीही मोठी खेळी खेळता आली नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने त्याला बोल्ड केले.

हेही वाचा: Shahid Afridi : IND vs PAK सामन्यात माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, शाहिद आफ्रिदीचा दावा

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सलामीला आला. शेवटच्या एक दिवसीय सामन्यात फिंचला मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त 5 धावा करून टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फिंचची विकेट दाखवण्यात आली आहे. तो बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या जागेवरून उभे राहून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. फिंचनेही बॅट उंचावून त्याला अभिवादन केले.

हेही वाचा: T20 World Cup : टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, बुमराह अन् पटेल फिट

अॅरॉन फिंचने आपल्या कारकिर्दीत 146 एकदिवसीय सामने खेळले आणि एकूण 5406 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 17 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत. त्याची सरासरी 39.13 होती. मात्र तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे.

Web Title: Australian Captain Aaron Finch Retirement From One Day Cricket Aus Vs Nz 3rd Odi Watch Video Finch Last Odi Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..